Santosh Deshmukh Case : तर आकाची लोकं मुंबई बंद करतील, सुरेश धस यांचा टोला

वाल्मीक कराडला अटक केल्याप्रकरणी कराडच्या समर्थकांनी परळीत आंदोलन केले आहे. त्यामुळे आकाची लोकं मुंबईही बंद करतील असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी लगावला आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, ही नावीन्यपूर्ण योजना आहे, आपला माणूस तुरुंगात गेल्यानंतर ज्याने एवढा मोठा उद्योग केला आहे, हा माणूस तुरुंगात गेल्यानंतर बीड-परळी बंद करा असं म्हणणं कितपत योग्य आहे? हा नवीन पायंडा पडेल. या पुढे जो कुणी तुरुंगात जाईल, त्यासाठी शहरं बंद करतील. कराडचे समर्थक मुंबईही बंद करतील असा टोला धस यांनी लगावला. तसेच वाल्मीक कराडचे आणि माझेही चांगले संबंध आहेत. पण कराड माणसं मारायला लागला तर त्याचेही मी समर्थन करणार का? असेही धस म्हणाले.