मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुर्दशा, युवासेनेच्या दणक्यानंतर दुरुस्तीला होणार सुरुवात

मेट्रोच्या कामासाठी वरळीत ठिकठिकाणी मेट्रो प्रशासनाने रस्ते खोदून ठेवल्यामुळे अपघात वाढले आहेत. ही बाब युवासेनेने मेट्रो प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वरळीतील सास्मिरा महाविद्यालय येथे मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांचे अपघात होत होते. ही गंभीर बाब दुचाकीस्वारांनी युवासेनेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना वरळी विधानसभेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी सदर बाब मेट्रोच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आज  अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पालिका अधिकारी कोयंडे व कोपर्डे हेदेखील उपस्थित होते.