डॉन बॉस्को शाळेने मारली बाजा; आगा खान चषक हॉकी स्पर्धा जिंकली

16 वर्षांखालील प्रतिष्ठेच्या ज्युनियर आगा खान के ओ हॉकी स्पर्धेत डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांचा बोलबाला दिसला. अंतिम सामन्यात सेंट अॅण्टोनियो सॅव्हियो शाळेचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव करून डॉन बॉस्को शाळेने विजेतेपद आपल्या नावावर केले. माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेच्या हॉकी मैदानात ज्युनिअर आगा खान चषक हॉकी स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी खेळविल्या गेलेल्या या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत 16 शाळेच्या संघांनी सहभाग घेतला होता. अखेर माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळा आणि दादर पश्चिमेकडील सेंट अॅण्टोनियो सॅव्हियो या शाळांमध्ये स्पर्धेची अंतिम लढत झाली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या या अंतिम लढतीत डॉन बॉस्कोने 4-2 असे गोल करून विजयाला गवसणी घातली. आदित्य राणे, अर्णव खोत, आरव फणसे, पार्थ चिंतन यांनी आपल्या संघासाठी गोल करून शाळेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.