कोविडनंतर हिंदुस्थानात मोदी सरकारचा पराभव झाल्याचे ‘मेटा’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे हिंदुस्थान सरकारची मानहानी झाल्याचा दावा करत संसदीय समितीने ‘मेटा’ला मानहानीचे समन्स बजावण्याचा निर्णय घेतला आहे. चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ‘मेटा’ने हिंदुस्थानची माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदार आणि कम्युनिकेशन- माहिती तंत्रज्ञानच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी केली आहे.