साध्वी भगवती
महाकुंभमध्ये देश-विदेशातील नागरिक सहभागी झाले आहेत. यात साध्वी भगवती सरस्वतीसुद्धा सहभागी झाल्या आहेत. त्या मूळच्या अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील असून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. त्या गेल्या 30 वर्षांपासून परमार्थ निकेतन श्रषिकेशमध्ये राहत आहेत. महाकुंभमध्ये केवळ संगममध्ये डुबकी मारण्याची संधी मिळत नाही तर ही डुबकी आस्थेत मारण्याची संधी मिळतेय, असे साध्वी भगवती यांनी म्हटले.
साध्वी हर्षा
साध्वी हर्षा रिछारिया यांची सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत आहे. साध्वी सुंदर असल्याने त्याची चर्चा होत आहे. साध्वी हर्षा याआधी अँकर म्हणून काम करत होत्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बँकॉकमध्ये एका डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता. हर्षा रिछारिया या इन्स्टाग्रामवरसुद्धा ऑक्टिव असतात. या अकाऊंटवरून त्यांनी साध्वी आयुष्याचे पह्टो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. साध्वी हर्षा यांनी दोन वर्षांपूर्वी साध्वी जीवन आत्मसात केले आहे. या साध्वीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमाल आर खान ऊर्फ केआरकेने या साध्वीला आगामी ‘देशद्रोही-2’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर दिली आहे. साध्वी हर्षा रिचरिया या मूळच्या उत्तराखंडच्या असून त्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या शिष्या आहेत.