मृत्युनंतर काय होतं, हे जाणून घेण्यासाठी नववीच्या विद्यार्थ्याने गुगल आणि युट्यूबवर सर्च केलं आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटना मेरठच्या भवानपूर परिसरातील एपेक्स कॉलनीमध्ये शनिवारी (11 जानेवारी) घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून नववीमध्ये शिकणारा मनोज (बदलेले नाव) वाईट संगतीच असलेल्या मुलांमध्ये वावरत होता. त्यामुळे आई व मोठ्या भावाने अनेक वेळा त्याला टोकले होते. तसेच त्याची बुलेटही विकण्यात आली होती. त्यामुळे तो नाराज होता. शनिवारी रात्री मनोजची आई नर्सची ड्यूटी संपवून मोठ्या मुलासोबत दुचाकीवरून घरी येत होते. यावेळी मनोज घराच्या बाल्कनीमध्ये उभा होता. आई व भावाला येताना पाहून तो घरात गेला आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. मनोजचा मोबाईल चेक केला असता त्याने गुगल आणि युट्यूबवर मृत्युनंतर काय होतं आणि गरुड पुराणा बद्दलसर्च केल्याचे दिसून आले. पोलिसांनी बंदुक जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे.