ट्रम्प यांच्या शपथविधीला जयशंकर जाणार

हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 20 जानेवारीला अमेरिकेला जाणार असून ते अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’च्या माध्यमातून ही माहिती दिली. ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. दुपारी 12 वाजता ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे त्यांना पदाची शपथ देतील.