दहावी, बारावी पास आहात… रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 90 हजारांहून अधिक पगार; क्रीडा कोट्यांतर्गत होणार भरती

रेल्वेत दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वेत क्रीडा कोटय़ांतर्गत भरतीची घोषणा केली आहे. उमेदवारांना तब्बल 90 हजारांहून अधिक पगार मिळणार असून आरक्षित वर्गासाठी अर्ज शुल्कात सवलत असणार आहे. वर्ल्ड कप, एशियन गेम्सपासून ते विद्यापीठ पातळीवर खेळांमध्ये चमक दाखवणाऱया उमेदवारांना यात प्राधान्य दिले जाणार आहे.

रेल्वेच्या क्रीडा कोटय़ांतर्गत ही भरती ग्रुप ‘सी’ पदांसाठी वेगवेगळ्या विभागात असणार आहे. कॅटेगरी ‘ए’मध्ये ओलंपिक गेम्स (वरिष्ठ), कॅटेगरी ‘बी’मध्ये वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, युथ ओलंपिक, डेविस कप, थोमस आणि उबर कप यांचा समावेश आहे, तर कॅटेगरी ‘सी’मध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप/ एशिया कप, साऊथ एशियन पेडरेशन गेम्स, यूसीआयसी, वर्ल्ड युनिर्व्हसिटी गेम्स यांचा समावेश आहे.

अर्ज शुल्क

खुला वर्ग – 500 रुपये

एससी, एसटी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्टय़ा मागासांसाठी 250 रुपये

निवड प्रक्रिया

कागदपत्रांची पडताळणी आणि खेळातील नैपुण्य

पगार (महिना)

लेवल 2 – 19,900 ते 63,200 रुपये
लेवल 3 – 21,700 – 69,100 रुपये
लेवल 4 – 25,500 – 81,100 रुपये
लेवल 5 – 29,200 ते 92,300 रुपये

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, दहावीची गुणपत्रिका, आयटीआय डिप्लोमा, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी, सही किंवा अंगठय़ाचा ठसा.

असा करा अर्ज

अधिकृत संकेतस्थळावर जावे. होम पेजवर अॅप्लाय बटणावर क्लिक करा. नोंदणी बटणावर क्लिक करून आवश्यक कागदपत्रांच्या मागणीची पूर्तता करावी. इतर माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर उमेदवाराने पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट काढावी.

काय आहे शैक्षणिक पात्रता

  • दहावी, बारावी पास, उमेदवारांनी कॅटेगरी ए, बी आणि सी आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप, इव्हेंट्समध्ये सहभाग घेतलेला असावा.
  • क्लर्क कम टायपिस्ट – टायपिंग स्पीड हिंदीसाठी 25 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशसाठी 30 शब्द प्रति मिनिट असावा.

कुठे करता येणार अर्ज

उमेदवारांना रेल्वेच्या scr.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

वयोमर्यादा

कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 वर्षे. उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2000 च्या आधी आणि 1 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा. वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 च्या आधारावर निश्चित केली जाईल.