नाशिकमध्ये अपघातात 8 भाविक ठार

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर रविवारी रात्री 8 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पाच जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावर लोखंडी गजाने भरलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून वेगात येणाऱया पिकअप टेम्पोने धडक दिली. या अपघातातील मयत व जखमी सर्व कामगार असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त नाशिक सिडको परिसरातील असून ते निफाड येथील देवदर्शनाच्या ठिकाणाहून परतत असताना हा अपघात झाला.

द्वारका उड्डाण पुलावर अपघात झाल्याने नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या.