मतभेद बाजूला ठेवून आम्ही लढा देऊ -सुप्रिया सुळे

माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून आम्ही लढा देत आहोत, असे स्पष्ट मत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, पूर्वी ज्या राष्ट्रवादी पक्षात थोडसं काही झालं तर राजीनामा दिले जायचे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु त्यांना पाठीशी घालत जात आहे. त्याला नेतृत्व ही संवेदनशील असाव लागतं. शरद पवार यांनी जेव्हा कोणीही एखादा प्रश्न उचलला आणि अशोक चव्हाण, आर.आर. पाटील, पद्मसिंह पाटील यांनी राजीनामा दिला होता. महाराष्ट्रातच नाही देशात असे किती उदाहरणे आहेत. एखादा मोठा अपघात झाला तर या देशातील रेल्वे मंत्र्यांनीही राजीनामे दिलेली विविध उदाहरणे आपण सगळ्यांनी गेल्या 75 वर्षांत पाहिलेली आहेत. त्यामुळे येथे हा काय वैयक्तिक विषयच नाही. सुरेश धस आज भारतीय जनता पक्षात आहेत. आज सोळंके अजित पवारांकडे आहेत. नैतिकता ही कुठल्याही आयडीलॉजीमध्ये असू द्या, नैतिकता ही नैतिकताच असते.  पण सगळ्यांची एकच भावना आहे की, मंत्रिमंडळात त्याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा. हे माणुसकीच्या नात्याने एक आलेले आहेत असे त्या म्हणाल्या.