बापरे, समोशामध्ये सापडला ब्लेडचा तुकडा

समोशामध्ये ब्लेडचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली. होमगार्ड जवान रमेश वर्मा यांच्यासोबत हा प्रसंग घडला. राजस्थानच्या टोंक जिह्यातील निवाईमध्ये एका समोशाच्या दुकानात ते नाष्टा करण्यासाठी गेले होते. प्रतिष्ठत जैन नमकीन भंडार येथून त्यांनी कचोरी आणि समोसे घेतले होते. जेव्हा समोसा तोडला तेव्हा त्यांना आतमध्ये ब्लेड दिसले. खाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत ब्लेड असलेला समोसाही जप्त केला. तेथील चटणी आणि इतर खाद्यपदार्थांचेही सँपल घेतले. या दुकानात अस्वच्छता आढळून आली असून दुकान मालकाला नोटीस पाठवण्यात आली.