क्रेडिट कार्ड वापरताना सावधान, जास्त खर्च केल्याने क्रेडिट स्कोअर होईल खराब

क्रेडिट कार्डचा जास्त वापर केल्यास किंवा जास्त खर्च केल्यास क्रेडिट स्कोअर खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे क्रेडिट कार्डद्वारे बिल भरतानाही काळजी घ्या. वेळेवर बिल पेमेंट करूनही ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 300 ते 900 पर्यंत असतो. 650 पेक्षा कमी स्कोअर खराब मानला जातो. क्रेडिट कार्डचा अतिवापर हे क्रेडिट स्कोअर स्थिर किंवा घसरण्याचे कारण असू शकते.

कार्ड मर्यादेच्या 10 ते 15 टक्के वापरणे ही आदर्श स्थिती आहे. 30 टक्क्यांहून अधिक पैसे खर्च केल्याने स्कोअर स्थिर होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. म्हणजेच, जर तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा 1.5 लाख रुपये असेल तर तुम्ही दरमहा 45 हजार रुपयांहून अधिक खर्च न केलेलाच बरा. दुसरे म्हणजे क्रेडिट रिपोर्ट 100 टक्के अचूक नसतात. या चुका तुमच्या आर्थिक वर्तनाचे चुकीचे वर्णन करू शकतात. अशा परिस्थितीत, क्रेडिट कार्डचा अहवाल नियमितपणे तपासा आणि काही चुका असल्यास त्या दुरूस्त करा. संतुलित क्रेडिट प्रोफाइल ठेवण्यासाठी सुरक्षित आणि असुरक्षित कर्जे असणे गरजेचे आहे. वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसारख्या एका प्रकारच्या कर्जावर अवलंबून राहणे क्रेडिट स्कोअरमध्ये अडथळा आणते. अशा स्थितीत सोने तारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचा समावेश कर्जामध्ये करणे केव्हाही उत्तम.

एकाचवेळी अनेक कर्जासाठी अर्ज नको

कमी कालावधी त एकाधिक क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज करू नका. यामुळे क्रेडिट रिपोर्टवर चौकशी वाढते. तसेच तुमचे क्रेडिट कमी होण्याचा धोका वाढतो. कारण, ते तुम्हाला क्रेडिटची नितांत गरज असल्याचा संदेश पाठवते. दरम्यान, जरी तुम्हे पेमेंट वेळेवर करत असाल परंतु, जुना रेकॉर्ड चांगला नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर 7 वर्षांपर्यंत दिसू शकतो.

जुने खाते बंद करू नका

लोक अनेकदा जुने क्रेडिट कार्ड बंद करतात. परंतु, असे केल्यास स्कोअर खराब होऊ शकतो. जुने क्रेडिट कार्ड असण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही बऱयाच काळापासून क्रेडिटचे व्यवस्थापन करत आहात.