10, 12 वी पास आहात, सरकारी नोकरी शोधत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…

आता 10 वी 12 पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने क्रीडा कोट्यातून 10 वी आणि 12 वी उतीर्ण विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. रेल्वे भरती सेलने (RRC) दक्षिण मध्य रेल्वेमध्ये क्रीडा कोट्याअंतर्गत भरतीची घोषणा केली आहे. याबाबतची अधिक माहिती scr.indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे.

रेल्वे स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत ही भरती वेगवेगळ्या विभागांमधील गट क पदांसाठी आहे. श्रेणी अ मध्ये ऑलिंपिक खेळ (वरिष्ठ), श्रेणी ब मध्ये विश्वचषक, जागतिक अजिंक्यपद, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, युवा ऑलिंपिक, डेव्हिस कप, थॉमस/उबर कप यांचा समावेश आहे. तर श्रेणी क मध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप/आशिया कप, दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स, यूसीआयसी, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स यांचा समावेश आहे.

याबाबत अर्ज करण्यासाठी 10वी, 12 वी उतीर्ण अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच उमेदवारांनी श्रेणी अ, ब, क आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा. लिपिक कम टंकलेखक पदासाठी टायपिंगचा वेग हिंदीमध्ये 25 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असावा.

उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 25 वर्षे असावी. उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2000 पूर्वी आणि 1 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा. वयाची गणना 1 जानेवारी 2025 च्या आधारावर केली जाईल.

या पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क असेल. तर अनुसूचित जाती/जमाती/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क असेल. या पदासाठी निवडप्रकिया क्रीडा कामगिरी चाचण्यांच्या आधारावर आणि कागदपत्रांच्या आधारावर होणार आहे.

या पदासाठी वेतनश्रेणी अशी असेल-
स्तर – 2 – 19,900 रुपये – 63,200 रुपये प्रति महिना
स्तर – 3 – 21,700 रुपये – 69,100 रुपये प्रति महिना
स्तर – 4 – 25,500 रुपये – 81,100 रुपये प्रति महिना
स्तर – 5 – दरमहा 29,200 – 92,300 रुपये प्रति महिना

आधार कार्ड, दहावी, बारावीची गुणपत्रिका, आयटीआय डिप्लोमा, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा अर्ज करताना ही कागदपत्रे महत्त्वाची आहेत.

अर्ज करण्याची माहिती

अधिकृत पोर्टल scr.indianrailways.gov.in ला भेट द्या.
होम पेजवरील APPLY बटणावर क्लिक करा.
नोंदणी बटणावर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरा.
इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
उमेदवारांनी पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट काढावी.