शहापूर-मुंबई नाशिक महामार्गावर रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आसनगाव ते चेरपोली फाट्यापर्यंत दोन ते तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आसनगाव रेल्वे ब्रिजवर कार आणि ट्रकमध्ये अपघात झाला. तसेच एक मालवाहू कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रस्त्यावरील बंद पडलेला कंटेनर तसेच कार व ट्रक रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.