सुमारे 200 कोटींच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरबूाबात एक बातमी समोर येत आहे. सुकेशने थेट अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने 2024-25 साठी आपले परदेशातील उत्पन्न जाहीर करण्याची परवानगी मागितली आहे. तसेच त्या कमाईवरचा कर भरण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.
सुकेशवर एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असल्यामुळे तो सध्या तुरुंगात आहे. तेथूनच त्याने निर्मला सितारामण यांना पत्र लिहिलयं. सुकेशने त्याच्या पत्रात अनेक गोष्टी मांडल्या आहेत. यामध्ये त्याच्या दोन परदेशी कंपन्या एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल (नेवाडा, यूएसए) आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन 2016 पासून कार्यरत आहेत.या कंपन्या ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचा हा व्यवसाय अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँग सारख्या अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. यातूनच 2024 मध्ये त्याने या कंपन्यांकडून 2.7 अब्ज डॉलर्स कमावले आहेत.
दरम्यान या वर्षभराच्या उत्पन्नावर उत्पन्नावर 7,640 कोटी रुपये कर भरायचा आहे. याचसोबत सुकेशला हिंदुस्थानातील तंत्रज्ञान आणि ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांना दिला आहे.