तामीळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महामहिम राज्यपाल रवी हे वारंवार संविधानाचा अवमान करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. अॅड. सीआर जया सुकीन यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यपाल रवी हे आपले कर्तव्य पार पाडत नाहीत. राष्ट्रपतींचे सचिव व अन्य प्रतिवादींनी रवी यांना माघारी बोलवून घ्यावे असे आदेश न्यायालयाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.