घरच्या घरी करा रेशन कार्ड केवायसी

रेशनकार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलंय. जर रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण झाली नसेल तर ती लवकर करा, अन्यथा रेशन मिळणे बंद होण्याचा धोका आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे रेशनिंग वितरणात पारदर्शकता येईल. त्यामुळे मोफत शिधा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

तुमच्या रेशन कार्डाची ई-केवायसी स्थिती तपासून घ्या. त्यासाठी राज्य अन्न सुरक्षा पोर्टलला भेट द्या. तुमच्या रेशन कार्डचा नंबर टाका. त्यानंतर शिधापत्रिका केवायसी स्थिती हा पर्याय निवडा. जर ई-केवायसी झाले असेल तर ‘होय’ असे दिसेल आणि झाले नसल्यास ‘नाही’ असे दिसेल.

घरबसल्या मोबाईल आणि संगणकाच्या मदतीने रेशन कार्डची ईकेवायसी सहजरीत्या करता येईल. नागरिकांना रेशनिंग कार्यालयात जायची गरज नाही. वेळ आणि श्रम वाचेल. पात्र लाभार्थ्यांना शासकीय मदत पोहोचवण्याचा उद्देश साध्य होईल. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डाची तत्काळ ई-केवायसी करून घ्या. आधारकार्डप्रमाणे रेशन कार्डमध्येही केवायसी करणे बंधनकारक असून याशिवाय रेशन कार्डवर मिळणारे धान्य ग्राहकांना मिळणार नाही.