वाशिम जिल्ह्यातील एक कोटी 15 लाख रुपयांच्या बॅग लुटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक; लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

वाशिम जिल्ह्यातील एक कोटी रुपयांच्या बॅग चोरीप्रकरणी लातूर शहरात एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एक कोटी 15 लाख रुपयांची बॅग चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.

वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी औसा रोड वरील एका लग्नकार्यालयाच्या पार्किंग मध्ये थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वप्निल परसराम पवार (वय 28, रा. तोंडगाव, वाशिम) याला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी हिंगोली गेट उड्डाणपूल जवळ,वाशिम येथे एका स्कुटी मोटरसायकल चालकास अडवून त्याला रॉडने मारहाण करून त्याच्याकडील 01 कोटी 15 लाख रुपयेची बॅग जबरदस्तीने चोरल्याचे सांगून पोलिसांच्या भितीने वाशिम जिल्ह्याच्या बाहेर पडून लातूर येथे आल्याचे सांगितले.

आरोपीला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस अंमलदार मोहन सुरवसे, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकाते, मुन्ना मदने यांनी केली आहे.