मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं.तसेच जर तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल. आम्ही तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंना दिला आहे.
हा मनोज जरांगे भीत नसतो. तुझ्या गुंडांना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारीनंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही. तुझी टोळी थांबाव, ही धमकी नाही, तर तुला सावध करतोय. हे थांबलं नाही तर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे.
आम्ही कधीच कोणाच्याच जातीवर बोललो नाही, आम्ही कायम गुंडावर बोललोय आणि बोलत राहणार. राज्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला म्हणून मराठा शांत आहे. देशमुख कुटुंबावर कोणी बोलेल तर त्या गुंडांचा बंदोबस्त आम्ही करू. धाराशिवमध्ये पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. मुख्यमंत्री साहेब सरकार म्हणून आम्ही तुमच्यावर थुंकतो. बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करा, त्यांना सरकारी वकील द्या, जन्मठेप होत नाही तोपर्यंत त्याची सुटका होता कामा नये. सर्व आमदारांनी या लेकीला न्याय द्या, हे सुटले तर तुमच्या मागे मी लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले. केजमध्ये पोरीला मारून टाकले, धन्या मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचे हे प्रताप आहेत. मी कधी त्यांचं नाव घेत नाही. मात्र धनंजय देशमुख यांना धमकी दिल्यानंतर मी नाव घेतलं. यांनी टोळ्या पाळल्या आहेत. यांनी लोकं मारायचं ठरवलं आहे. यांना जातीशी देणेघेणे नाही. कोणावर हल्ला करायची गरज नाही, मात्र प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. तुमच्या कुटुंबाचे तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. यांना थांबवायचं नसेल तर आपला ना इलाज आहे, हे फक्त मुठभर लोकं आहेत. त्यांचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल, असेही जरांगे म्हणाले.
काळ धावून आला आहे, काळ संपवायचा असेत तर धनंजय मुंडे त्याचं पाप झकण्यासाठी ओबीसींचे पांघरून घेत आहे. यात ओबीसी चा काय संबंध आहे? वंजारी, धनगर, दलित कोणाला बोललो नाही, गुंडांना बोलायचं नाही का? तुम्ही त्रास देत राहिलात तर मराठ्यांना उठाव करावा लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले. नांदेडचा बिहार होऊ द्यायचा नाही. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना करू नये, अशी मागणी नांदेड येथील सकल मराठा समाजाने केली आहे. वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करून त्यांची चौकशी करावी, वाल्मीक कराडचा बॉस धनंजय मुंडे आहेत. तसेच मुंडे यांनी नैतिक जवाबदारी समजून राजीनामा द्यावा, अशी सर्व समाजबांधवांची मागणी आहे, असेही जरांगे म्हणाले.