बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा, विक्रोळीत विचित्र अपघातात दोन जण जखमी

मुंबईत बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. लालबाग आणि कुर्लामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला होता.

विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये बेस्टच्या बस डेपोमध्ये एक चालक गाडी सुरू ठेवूनच नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतरही बस अचानक सुरू झाली. ज्या भागात हा बस डेपो आहे तो भाग रहदारीचा असून तिथे एक महाविद्यालयही आहे. तिथेच असणाऱ्या एका चहाच्या दुकानाला धडक लागली, या धडकेत दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या बस चालकाला अटक केली आहे.