2024 हे आतापर्यंत सर्वाधिक तापमान असलेले वर्ष होते, असा अहवाल कोपर्निकस क्लायमेट चेंज संस्थेने दिला आहे. हवामान बदलामुळे भारतातही समस्या निर्माण होते, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून आदित्य ठाकरे म्हणाले की, हवामान बदलाचा फटका आपल्या सगळ्यांना बसतोय, तरी या समस्येबाबत आपण अद्याप जागरूक नाही आहोत. भारतात आपल्या शहरांमध्ये शाळा, घर, ऑफिसेस तसेच ग्रामीण भागात शेतीवर वातावरण बदलामुळे मोठ्या फटका बसतोय. हवामान बदलाची समस्या आपण पूर्णपणे समजू शकलेलो नाही. हवामान बदलामुळे पूर, दुष्काळ आणि भुस्खलनासारख्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे स्थलांतर होत आहे. आणि स्थलांतरामुळे राजकीय आणि सामाजिक संकटंही निर्माण होत आहे. एक व्यक्ती म्हणून आपण या समस्येशी नाही लढू शकत. सरकार आणि कॉर्पोरेट संस्थांनी यावर कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.