हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती गंभीर असल्यचे बोलले जात आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वृत्तामुळे चित्रपटसृष्टीत कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेचे टीकू तलसानिया यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण चाहतावर्ग त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत. टीकू तलसानिया यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते टीकू तलसानिया यांचा जम्न 1954 मध्ये झाला. आता सध्या टीकू 70 वर्षांचे असून 1984 साली टेलिव्हिजन शो ‘ये जो है जिंदगी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अवघ्या दोन वर्षातच म्हणजे 1986 साली त्यांनी ‘प्यार के दो पल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘प्यार के दो पल’, ‘ड्यूटी’, ‘असली नकली’ या चित्रपटांमध्ये दिसून आलए. त्याच प्रमाणे ‘बोल राधा बोल’, कुली नंबर 1’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हीरो नंबर 1’, ‘बडे मिया छोटे मिया’ ‘विरासत’ व ‘हंगामा 2’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.