Photo – कला, संस्कृतीचा अपूर्व संगम; छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हला उत्तम प्रतिसाद

दरवर्षी मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा छत्रपती शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून येथे कला, संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा अपूर्व संगम दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरात दिसून येतो आहे.

फोटो – रुपेश जाधव 

कला महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन.

अली आदिलशाहाचे लारी नावाचे अत्यंत दुर्मिळ नाणे ठेवण्यात आले आहे.

मातीच्या गोळ्याला आकार द्यायची संधीही मिळत आहे.

आर्ट फेस्टिव्हलमध्ये चित्रकलेची आवड असणाऱ्या रसिकांना चांगलीच पर्वणी आहे.

या प्रदर्शनात शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती तयार केली आहे.

मराठय़ांचा समुद्री लढायांचा इतिहास, शिवकालीन तलवारी यांचे प्रदर्शन दाखवण्यात आले आहे.

खाद्यसंस्कृतीचे दर्शन आणि त्याचा आस्वाद घेणारे खवय्या कार्यक्रमाची पर्वणी आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतीकृती उभारण्यात आली आहे.

पोर्तुगीज जहाजाची प्रतीकृती उभारण्यात आली आहे.