Santosh Deshmukh Case – सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, वाल्मीक कराडचं काय?

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. विशेष तपास पथकाने सुदर्शन घुले, मेहश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतिक घुले आणि विष्णू चाटे या सर्व सातही आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाल्मीक कराड याच्यावर मात्र अद्याप पर्यंत मोक्का लावण्यात आलेला आहे. त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सातही आरोपींवर मोक्का लावला याबाबत अभिनंदन, पण या सगळ्यांचा जो बाप आहे त्याचे काय करायचे? हे सातही आरोपी जगाला पहिल्यापासून माहिती आहे. पण फोनवर तिथे बोलले कोण? हे सर्व खंडणीतून झाले आणि त्यात कोण आरोपी आहेत? खंडणीचा मास्टरमाइंड होता? असा सवाल या कारवाईवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.