एका अल्पवयीन मुलीचे 64 जणांनी लैंगिक शोषण केले आहे. केरळमधील ही धक्कादायक घटना असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही मुगली दोन महिन्यांपूर्वी 18 वर्षांची झाली आहे.
केरळमधील पथनामथिट्टा बाल कल्याण समितीचे संचालक राजीव एन यांच्याकडे पीडीत मुलीने पहिल्यांदा तक्रार केली. बाल कल्याण समितीने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडित मुलगी खेळाडू असून पथनामथिट्टाच्या अनेक भागात तिच्यावर अत्याचार झाला आहे. त्यात कोच, तिच्याच वर्गात शिकणारे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पथनामथिट्टा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख या घटनेचा तपास करत आहेत.
पीडित मुलीकडे स्वतःचा फोन नसल्याने ती वडिलांचा फोन वापरते. या फोनमध्ये तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 40 जणांचा नंबर तिने सेव्ह करून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.