आप आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू, चुकून स्वतःवरच झाडली गोळी

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. गोगी यांनी चुकून स्वतःवरच गोळी झाडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

पंजाबमध्ये लुधियाना पश्चिम मधून निवडून आलेले आपचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे निधन झाले आहे. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गोगी आपल्या खोलीत होते. तेव्हा चुकून बंदुकीतून त्यांच्याच हातून गोळी सुटली. ही गोळी त्यांना लागली. कुटुंबीयांनी गोगी यांना दयानंद रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गोगी यांनी 2022 साली आम आदमी पक्षात प्रवेश घेतला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीत गोगी यांनी विद्यमान आमदार आणि मंत्री भारत भुषण अशू यांचा साडे सात हजार मताधिक्यांनी पराभव केला होता.