‘लाडकी बहीण’सारख्या महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनांचा मतदानावर मोठा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या राज्यांत महिलांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली त्या राज्यांत महिला मतदारांची संख्या 5 टक्क्यांनी वाढली. स्टेट बँकेच्या संशोधनात हा धक्कादायक निष्कर्ष काढला आहे.
महाराष्ट्रासह 19 राज्यांत महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली गेली. या राज्यांत मतदान करणाऱया महिलांची संख्या तब्बल दीड कोटींनी वाढली. ज्या राज्यांत अशा योजनांची घोषणा केली नाही अशा राज्यांत महिला मतदारांच्या संख्येत जवळपास 30 लाखांची वाढ झाली. स्टेट बँकेच्या अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांत नऊ कोटींहून अधिक नवमतदारांनी आपला मताधिकार वापरला, त्यात 58 टक्के प्रमाण महिलांचे होते.
महिला सशक्तीकरणासाठी सुरू केलेली मुद्रा कर्ज योजना 36 लाख महिलांच्या मतदानाचे कारण बनली. त्याचप्रमाणे घरकुल योजनेतून घर मिळाल्याने 20 लाख महिलांनी तसेच 21 लाख महिलांनी केवळ शौचालयाची सुविधा उपलब्ध झाल्याने मतदान केले. स्वच्छ पिण्याचे पाणी आणि वीज मिळाल्यानेही महिलांचे मतदान वाढले आहे. महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सर्वाधिक महिला मतदार वाढल्याचे एसबीआयच्या अहवालातून उघड झाले आहे.