रॅली काढणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड, जामिनावर सुटल्यानंतर येरवड्यात काढली होती मिरवणूक

‘मोक्का’च्या गुह्यात जामीन मिळाल्यानंतर येरवडय़ात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी 35 ते 40 गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर टोळीप्रमुखाच्या साथीदारांना पकडून पोलिसांनी त्यांची लक्ष्मीनगर परिसरात धिंड काढली. पोलिसांनी चौकात तात्पुरता मंडप उभा करून गुन्हेगारांना चांगलाच चोप दिला. नागरिकांच्या समक्ष केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांचे काwतुक केले जात आहे. कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर गुंड प्रफुल्ल कसबे आणि साथीदारांनी मिरवणूक काढून दहशत माजविली होती.

जामीन मिळाल्यानंतर येरवडा कारागृहातून बाहेर पडलेला कसबे आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी  येरवडय़ातील लक्ष्मीनगर परिसरातून मोटारी व दुचाकाRवरून रॅली काढली. ‘येरवडय़ातील भाई मीच’ असा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये प्रसारित करून दहशत माजविली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ-4 चे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी कसबे आणि साथीदारांचा शोध सुरू केला. कसबे पोलिसांना सापडला नाही, मात्र गुरुवारी रात्री कसबेच्या साथीदारांना ताब्यात घेतले.

मोटारीतून रॅली ते धिंड

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कसबेसह टोळक्याने मोटारींसह दुचाकाRवर रॅली काढली. मोठमोठय़ाने घोषणा देत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेसह येरवडा पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर भरचौकात त्यांना चोपले. त्यानंतर त्यांचे हात दोरीने बांधून लंगडत चालत नेल्याच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

 जामिनावर सुटका झाल्यानंतर रॅली काढल्याप्रकरणी आतापर्यंत नऊजणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीसह इतरांचा शोध सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.

z हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-4