पुष्पातील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना हिला जीममध्ये व्यायाम करताना दुखापत झाली आहे. डॉक्टरने रश्मिकाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. रश्मिका सध्या सिकंदर या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. ती सलमान खान सोबत पहिल्यांदाच दिसणार आहे. रश्मिकाला दुखापत झाल्याने तिच्या काही प्रोजेक्ट्समधील शूटिंग पुढे ढकलले आहे. रश्मिका लवकरच बरी होऊन सेटवर येईल, असे सांगण्यात येत आहे. सिकंदर चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना, कालज अग्रवाल, प्रतिक बब्बर, सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रश्मिकाने पुष्पामध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे.