इमामी लिमिटेडने गुरुवारी ‘फेअर अँड हँडसम’ या प्रमुख पुरुष ग्रूमिंग ब्रँडचे ‘स्मार्ट आणि हँडसम’ असे पुनर्ब्रँडिंग करण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आता या ब्रँडचा अॅम्बेसेडर असणार आहेत. मागील दोन दशकांपासून या ब्रँडने पुरुषांच्या ग्रूमिंग क्षेत्रात आपलं एक बळकट स्थान निर्माण केलं आहे. यातच आता ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांच्या अनुषंगाने अधिक व्यापक आणि संपूर्ण ग्रूमिंग उत्पादने कंपनीने प्रस्तुत केली आहेत.
ग्राहकांच्या आजच्या आवडीनुसार, पुरुषांची त्वचा आणि वेलनेस या गोष्टी महत्वाच्या बनल्या आहेत. कंपनीने आपल्या ताज्या ब्रँडिंगमध्ये एक संदेश दिला आहे, “हर रोज हँडसम कोड,” जो दर्शवतो की फक्त चांगले दिसणेच पुरेसे नाही, दररोज आत्मविश्वास मिळवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासोबतच ब्रँडच्या नवीन ओळखीसाठी आकर्षक पॅकेजिंग तयार करण्यात आलं आहे, ज्यात ‘फेअर अँड हँडसम इज नाऊ स्मार्ट अँड हँडसम’ असा ठळक संदेश देखील असेल. या ब्रँडने फेस, बॉडी आणि हेअर स्टाईलसाठी आपली नवीन उत्पादने सादर केली आहेत.