आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉन असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रमी 60 हजारहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. रविवारी, 19 जानेवारी, 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स्पर्धेला सुरुवात होईल. आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि आतापर्यंत सर्वाधिक अंतर पार केलेला पुरुष ट्रॅक डिस्टन्स धावपटू मो फराह याची आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर (इंटरनॅशनल इव्हेंट ॲम्बेसेडर) म्हणून निवड करण्यात आली आहे.
फराहने चार ऑलिम्पिक आणि सहा जागतिक सुवर्णपदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक (2012 आणि 2016) आणि जागतिक (2013 आणि 2015) अशा दोन्ही स्पर्धांमध्ये 5 हजार मीटर आणि 10 हजार मीटर धावणे प्रकारात विजेतेपद राखणारा तो पहिला पुरुष धावपटू आहे. त्यामुळे ‘क्वाड्रॅपल डबल’ असे त्याचे वर्णन केले जाते. 41 वर्षीय फराहने सलग 10 जागतिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे केला आहे. ज्याची सुरुवात डेगू येथील 2011 जागतिक स्पर्धेतील 5 हजार मीटर सुवर्णपदकापासून झाली आणि लंडनमधील 2017 जागतिक स्पर्धेतील 10 हजार मीटर सुवर्णपदकाने त्याची आपल्या करिअरची सांगता केली. नंतरच्या टप्प्यात आघाडी घेण्याच्या आणि सर्व पुनरावृत्तीच्या आव्हानांना तोंड देण्याच्या त्याच्या स्टँड-आउट रणनीतीमुळे ट्रॅक डिस्टन्स रनिंग स्पर्धांच्या इतिहासातील काही सर्वात प्रेरक क्षण निर्माण झाले. रोड रनिंगवर आपले लक्ष केंद्रित केल्यानंतर फराहने त्याच वर्षी लंडन मॅरेथॉनमध्ये तिसरे स्थान मिळवून 2018 शिकागो मॅरेथॉन जिंकली. एक तास रन धावण्यासाठीच्या (21,330 मी) जागतिक स्तरावरही त्याचे नाव आहे.
जगातील अव्वल 10 मॅरेथॉनमध्ये स्थान मिळालेल्या आणि USD 390,238 इतके बक्षीस असलेल्या टाटा मुंबई मॅरथॉनमध्ये यंदा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश असेल. त्यात पुरुष गटात गतविजेते हेले लेमी बेरहानू आणि श्रीनु बुगाथा तसेच महिला गटातील विजेत्या अबराश मिन्सेवो आणि ठाकोर निर्माबेनचा समावेश आहे. आज, धावणे (रनिंग) हा सर्वात वेगाने वाढणारा सहभागी खेळ आहे आणि प्रत्येक वर्षी या मॅरॅथॉनमध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी होत आहेत. एलिट (मुख्य) मॅरेथॉनमध्ये विक्रमी 11,791 धावपटूंची नोंदणी हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग असेल. हाफ मॅरेथॉन (13771), 10 किमी (7184), चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी (1089), ज्येष्ठ नागरिकांची रन (1894), आणि ड्रीम रनसाठी (24238) मोठया प्रमाणात नोंदणी झाली आहे. मॅरेथॉनच्या व्हर्च्युअल रनसाठी नोंदणी बुधवार, 15 जानेवारी 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत किंवा सर्व स्पॉट्स भरल्यानंतर किंवा यापैकी जे आधी असेल ते चालू राहतील. अधिक माहितीसाठी, लॉग ऑन करा – https://tatamumbaimarathon.procam.in/.