बॉलिवूडमधील मोस्ट एलीजीबल बॅचलर सलमान खान 59 वर्षाचा झाला आहे. वयाची साठी गाठत आला तरी अद्याप त्याचे लग्न झालेले नाही. अनेक अभिनेत्रींशी सूत जुळल्यानंतरही ते लग्नापर्यंत पोहोचले नाही. वय वाढले असतानाही सलमानने लग्न का केले नाही हा प्रश्न सर्वांनाच पडतो. आता सलमानचे वडील सलीम खान यांनी याबाबत खुलासा केला आहे.
एका मुलाखतीमध्ये सलीम खान यांना सलमानच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला जातो. याला उत्तर देताना ते म्हणतात की, सलमानचे नक्की काय आहे ते कळत नाही. त्याची विचार करण्याची पद्धत थोडी विरोधाभासी असल्याने कदाचित त्याचे लग्न जमत नसावे.
चित्रिकरणादरम्यान अभिनेत्रींशी झालेल्या सलगीमुळे किंवा त्यांच्या प्रेमात पडल्यामुळे सलमान त्यांच्याकडे खेचला जातो. त्या अभिनेत्रीही देखण्या असतात. काम करताना त्यांच्याबरोबर संवादही होतो. एकाच वातावरणात राहत असल्याने त्यांच्यात सलगीचे नातेही तयार होते. यातल्या बहुतांश त्याच्या नायिकाच असतात, असेही ते म्हणाले.
सलमान एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला की तो तिच्याच आईचे गुण शोधतो. लग्नानंतर आईप्रमाणेच घरी थांबावे अशी त्याची इच्छा असते. मात्र अभिनेत्री स्वत:च्या करिअरला प्राधान्य देतात. त्यांना फक्त गृहिणी म्हणून पाहणे ही खरे तर सलमानची चूक आहे. कारण लग्न करून गृहिणीचे आयुष्य जगण्याचा विचार कोणती अभिनेत्री करेल? असेही ते म्हणतात.
Posts from the bollyblindsngossip
community on Reddit
जेव्हा दोघे कमिटेड असतात तेव्हा सलमान तिला बदलण्याचा प्रयत्न करतो. तिच्यात आई शोधतो. मुलांसाठी उठून ब्रेकफास्ट करणे, जेवणे बनवणे, त्यांचे आवरणे, शाळेत घेऊन जाणे, होमवर्क घेणे अशी कामं महत्वाकांक्षी अभिनेत्री का स्वीकारेल? असा सवालही सलीम खान यांनी केला.
सलमानच्या घराची गॅलरी, खिडक्या आता बुलेटप्रूफ; 24 तास कॅमेऱ्याचा वॉच