छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, तीन नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही मृतदेह सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहेत. परिसरात शोध मोहिम अद्याप सुरू आहे.

पोलीस वाहनावर हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी छत्तीसगमध्ये नक्षलविरोधी मोहीम राबवली आहे. गेले तीन दिवस सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू आहे. गुरुवारी शोध मोहिमेदरम्यान सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांकडून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.