वीज कंपनीचा फ्यूज उडाला; पाठवलं 2 अब्ज रुपयांचं बील, ग्राहकाची बत्ती गूल

हिमाचल प्रदेशात वीज कंपनीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. बेहरविन जट्टान गावातील एका नागरिकाला तब्बल 2 अब्ज रुपयांचे वीज बिल आल्याने त्याला धक्काच बसला. ललित धीमान असे सदर नागरिकाचे नाव असून त्याचा गावात छोटासा व्यवसाय आहे. धीमान यांनी तात्काळ वीज कंपनीत तक्रार दाखल केली.

धीमान यांना नोव्हेंबर 2024 चे 2500 वीजबिल आले होते. मात्र पुढच्या महिन्याचे डिसेंबर 2024 चे वीजबिल 2,10,42,08,405 रुपये इतके आले. वीजबिल पाहून धीमन यांना धक्काच बसला. त्यांनी वीज मंडळ कार्यालयात धाव घेतली.

वीजबिल कर्मचाऱ्यांनी धीमान यांच्या तक्रारीनंतर वीज मंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती केली. यानंतर धीमन यांना 4, 047 रुपयांचे सुधारीत बिल देण्यात आले.