कॉफी आणि चहा हे दोन्ही जगभरात लोकप्रिय पेय आहेत. बहुतेक लोक ही पेये पिऊन सकाळची सुरुवात करतात. यातच बऱ्याच वेळा आरोग्य तज्ञ म्हणतात की, कॉफी किंवा चहा रिकाम्या पोटी पिऊ नये. कारण त्याचे काही दुष्परिणाम आहेत. याचे माफक प्रमाणात सेवन केल्यास, आपल्याला दोन्ही पेयांचे आरोग्यदायी फायदे मिळतात. एका नवीन संशोधनात असे समोर आले आहे की, जर आपण सकाळी कॉफी प्यायलो तर, ते तुमचे आयुष्य वाढवू शकते. या संशोधनात काय सांगण्यात आलं आहे, हे जाणून घेऊ..
संशोधन काय सांगतो?
हे संशोधन 1999 ते 2018 दरम्यान 40,725 लोकांवर पोषण परीक्षा सर्वेक्षणाद्वारे करण्यात आले आहे. या संपूर्ण कालावधीत संशोधन पथकाने सर्व लोकांचा दैनंदिन आहार आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन याचा अभ्यास केला आहे. त्यांची दर आठवड्याला तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्यांना आढळले की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांमध्ये जे सकाळी कॉफी पेय पीत होते त्यांचे आयुष्य 16 टक्क्यांपर्यंत वाढते. त्याचबरोबर दिवसभरात इतर वेळी कॉफी घेतली तर काही तोटेही दिसून आले आहेत.
विओनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांना कार्डिओ समस्यांचा धोका कमी असतो. तसेच दिवसाच्या कोणत्याही वेळी कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये असे कोणतेही आरोग्यदायी बदल दिसून आले नाहीत. या संशोधनात असा कोणताही दावा करण्यात आला नाही की, जर तुम्ही सकाळी कॉफी प्यायली तर तुम्हाला हृदय किंवा कार्डिओचा त्रास होणार नाही किंवा त्यामुळे मृत्यू होणार नाही. याची पुष्टी करण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.
रोज सकाळी कॉफी पिण्याचे फायदे
- दररोज 1 कप कॉफी प्यायल्याने ऊर्जा वाढते.
- कॉफी प्यायल्याने तुमचा फोकस वाढतो आणि तुमचे मन शांत राहतं.
- कॉफी प्यायल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
- कॉफी वजन कमी करण्यासही मदत करते.
- कॉफीचे सेवन केल्याने बीपी आणि मधुमेह नियंत्रित राहतो.
Disclaimer: वर दिलेल्या माहिती ही विओनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार देण्यात आली आहे. Saamana Online याद्वारे कोणताही दावा करत नाही.