लोकलमधून पडून मृत्यू, पालकांना 4 लाख रुपयांची भरपाई

मध्य रेल्वेने प्रवास करत असताना लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना 4 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले. ही घटना 8 मे 2010 रोजी घडली. वडाळाहून चिंचपोकळीला जात असताना लोकलमधील गर्दीने नासीर खानचा बळी घेतला. प्रवाशी एकमेकांना ढकलत असताना नासीर लोकलमधून पडला. यात त्याचा मृत्यू झाला.