महत्त्वाचे – जात पडताळणीसाठी विशेष मोहीम

बारावीत विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱया ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांच्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून http://www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदव्युत्तर वैद्यकीयसाठी पात्रता निकष शिथिल

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी एमडी, एमएस, डीएनबी अभ्याक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष शिथिल केले आहेत. सर्वसाधारण व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी पर्सेंटाईल 50 वरून 15, दिव्यांगांसाठी पर्सेंटाईल 45 वरून 10 तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे पर्सेंटाईल 40 वरून 10 पर्यंत कमी केले आहेत.