महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी योग्य असल्याचे मत एमपीएससीचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सन 2013 मध्ये स्पष्ट केले आहे. कारण वर्णनात्मक परीक्षांचा निकाल वर्षभर लागत नाही. त्यामध्ये गुणदान पद्धतीमध्ये भेदभाव केला जातो. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक परीक्षेला ठाम विरोध असून जुन्याच पॅटर्ननुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धती कायम करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 पासून चंद्रकांत दळवी समितीच्या शिफारशीनुसार, वर्णनात्मक पॅटर्न अभ्यासक्रम हा यूपीएससी परीक्षेची कॉपी व महाराष्ट्राच्या संदर्भासह आहे. हा अभ्यासक्रम यूपीएससी परीक्षेपेक्षा जास्त असून आयएएस व नायब तहसीलदार या दोघांच्या निवडीकरीता सारखाच अभ्यासक्रम असल्याने एमपीएससी राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. यात एका एका विषयाचे हजारो रुपये फी घेणाऱ्या क्लास लॉबीसाठी हा निर्णय आहे. गावाकडील गोरगरीब 98 टक्के विद्यार्थ्यांच्या बहुपर्यायी पॅटर्न विरोधात हा निर्णय असून सन 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा बहुपर्यायी पॅटर्न चालू ठेवावा, अशी मागणी लाखो विद्यार्थी करीत आहेत.
विद्यार्थ्यांची मागणी नसतानादेखील परीक्षा पद्धती जबरदस्तीने त्यांच्यावर लादली जात आहे. ही एकप्रकारे विद्यार्थ्यांची गळचेपी केली जात आहे. वर्णनात्मक परीक्षांचा निकाल वर्षभर लागत नाहीत त्यामध्ये गुणदान पद्धतीमध्ये भेदभाव केला जातो. विद्यार्थ्यांना विचारात घेऊनच आयोगाने निर्णय घेणे गरजेचे होते. वर्णनात्मक परीक्षेमुळे बहुतांश विद्यार्थी बाहेर फेकले जाणार आहेत. राज्य शासन व आयोगाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. पारंपारिक वर्णनात्मक पद्धतीला विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून जुन्याच पॅटर्ननुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धत कायम सुरु ठेवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
बहुपर्यायी परीक्षा विदयार्थ्यांना योग्य का?
पेपर तपासणी करताना तज्ञ शिक्षकाची आवश्यकता नाही. त्यामुळे पेपर तपासणी प्रक्रियाव्दारे सुलभ व जलद केली जाते. प्रत्येक विषयाच्या तज्ञ शिक्षकाने दिलेले प्रश्नाचे उत्तर पर्यायात उपलब्ध करून दिलेले असल्यामुळे उलट पेपर तपासणी करण्याची आवश्यकता नाही. पेपर तपासणी करताना गुण देताना दुजाभाव होत नाही. कारण योग्य प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय १०० टक्के एक सारखेच असते. तसेच प्रश्नाच्या उत्तराबाबत संदिग्धता आढळल्यास आयोग तो प्रश्न रद्द करते.
वर्णनात्मक परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध का?
पेपर तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात तज्ञ शिक्षकांची आवश्यकता असते. यासाठी आयोगाच्या आस्थापनात स्थायी तज्ञ शिक्षक उपलब्ध नाहीत. म्हणून इतर महाविदयालयातून तात्पुरत्या स्वरूपात मागणी करून उपलब्ध होतात. उत्तर पत्रिकेतील प्रत्येकी अक्षर आणि मुद्दे तपासणे वेळ दडपणारी प्रक्रिया आहे. परिणामी अंतिम निकाल प्रसिद्ध करताना विलंब लागतो. उत्तर पत्रिका तपासणीत उत्तराचे मुल्यांकन करताना दुजाभाव होण्याची दाट शक्यता आहे. उत्तर पत्रिका तपासणीवेळी शिक्षकाची प्रतिकूल मनस्थिती नसणे. बहुसंख्य उमेदवार एक सारखा ऑप्शनल पेपर निवडून एकाच ऑप्शनल पेपर मधून जास्त गुण मिळून अंतिम निवड यादीतील संख्या सरासरी प्रमाणापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ राहुरी विद्यापीठातून सन 2008 ते सन 2012 या कालावधीत अॅग्रीकल्चर विषयातून पदवी घेणारे उमेदवार अॅग्रीकल्चर हा विषय घेऊन सर्वात जास्त गुण प्राप्त करत आहेत. जे की स्पर्धा तपासणी समपातळीवर भेदभाव करताना दिसतो.