‘इस्रो’ने डॉकिंग प्रयोग पुढे ढकलला

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 9 जानेवारीला होणारा स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पाडेक्स) पुन्हा पुढे ढकलला. दोन अवकाश उपग्रहांमध्ये जास्त अंतर आढळून आल्यानंतर इस्रोने हा निर्णय घेतला. अद्याप नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, उपग्रहांमधील अंतर 225 मीटरपर्यंत कमी करण्याच्या ऑपरेशनदरम्यान समस्या उद्भवली. त्यामुळे 9 जानेवारी रोजी होणारी डॉकिंग प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून उपग्रह सुरक्षित आहेत. इस्रोने 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून रात्री 10 वाजता अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत पीएसएलव्ही- सी60 रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून 470 किमीवर दोन अंतराळ यान तैनात करण्यात आले.

 स्पेस डॉकिंग म्हणजे अंतराळात दोन स्पेसक्राफ्ट जोडणे. ही प्रक्रिया दोनदा पुढे ढकलण्यात आली. याआधी 7 जानेवारी आणि 9 जानेवारी रोजी या मोहिमेत बुलेटच्या वेगापेक्षा दहापट वेगाने अंतराळात जाणारी दोन अंतराळ याने एकमेकांना जोडली जाणार होती.