नेपाळमार्गे हिंदुस्थानात पोहोचत असलेला चिनी लसूण आणि पॉपकॉर्नमुळे डोकेदुखी वाढली आहे. कारण लसूण आणि पॉपकॉर्न खाणे हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान आणि नेपाळ या दोन देशांमध्ये वाणिज्य सचिवस्तरीय बैठक चार वर्षांनंतर आज आणि उद्या होत आहे. चीनमधून नेपाळमार्गे हिंदुस्थानी बाजारपेठेत पोहोचणारा चिनी लसूण आणि पॉपकॉर्न हा या बैठकीत मुद्दा प्राधान्याने ठेवण्यात आला आहे. चीनमधून नेपाळमध्ये लसणाच्या आयातीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मागील पाच महिन्यांत ही आयात नऊ पटीने वाढली आहे. चीनमधून नेपाळमध्ये आयात केलेला चिनी लसूण तस्करीद्वारे हिंदुस्थानी बाजारपेठेत पोहोचवला जात आहे.