आयफोन यूजर्ससाठी मोठी अपडेट, आता ‘या” प्रॉब्लेमचा सामना करावा लागणार नाही

तुम्हीही Apple iPhone वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. कंपनीने आयफोन युजर्ससाठी iOS 18.2.1 अपडेट जारी केले आहे. या अपडेटसह कंपनीने AI फीचरमधील बग फिक्स केले आहेत. आधीच्या iOS 18.2 अपडेटसह कंपनीने फोनमध्ये ChatGPT सह Siri अपडेट केलं होतं. या अपडेटसह AI फीचर्स वापरताना येणारे प्रॉब्लेम फिक्स करण्यात आले आहे. जर तुम्ही एआय फीचर्सला सपोर्ट करणारा आयफोन वापरत असाल तर आता हे नवीन अपडेट इन्स्टॉल करा…

iOS 18.2.1 अपडेटमध्ये काय आहे खास?

iOS 18.2.1 अपडेट आयफोन युजर्स डाउनलोड करू शकतात, ज्यांनी मागील महिन्यात iOS 18.2 अपडेट इंस्टॉल केले आहे. Apple च्या अपडेट नोटमध्ये सांगण्यात आलं आहे की, “या अपदेटमध्ये मोठे बग फिक्स करण्यात आले आहेत.” म्हणजेच यामध्ये कोणतेही मोठे फीचर्स अपडेट करण्यात आले नाही.

iOS 18.2.1 अपडेट कसं इंस्टॉल करावं?

सर्वातआधी आपल्या iPhone च्या सेटिंग्ज वर जा.

जनरल वर क्लिक करा आणि सॉफ्टवेअर अपडेट टॅप करा.

तुम्हाला नवीन अपडेटेड व्हर्जन पॉप-अप दिसेल.

यानंतर पासकोड टाका आणि नवीन अपडेट डाउनलोड करा.