यांनी तर रानबाजार मांडला आहे, उत्तम जानकर यांचा धनंजय मुंडेवर निशाणा

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. दरम्यान एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना धनंजय मुंडे यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यावरून माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

”हे राज्य नैतिकतेचं राज्य होतं. विलासराव देशमुख, आर आर पाटील यांच्यासाठी एक चुकीचा शब्द देखील त्यांच्या नितीमत्तेसाठी पुरेसा होता. यांनी तर रानबाजार मांडला आहे. अनेक लोकांचे इतके घाणेरडे आरोप होत आहेत. मी स्त्री वेश्या पाहिली आहे. पण पुरुष वेश्या असू शकतो हे आता पाहतोय. हे असे मंत्री जर सरकार चालवत असतील तर या राज्याने काय घ्यायचं, अशी टीका जानकर यांनी केली.