मनात नाही ठेवायचं ‘घडा घडा बोलायचं’, भूषण प्रधान, सिमरन नेरुरकरचा म्युझिकल चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मराठी सिनेसृष्टीत प्रत्येक कलाकार आपले विचार स्पष्टपणे मांडताना दिसतो. जे त्याच्या मनात असतं, तेच त्याच्या शब्दांमध्ये उमठत असतं. याच विचारधारेवर आधारित भूषण प्रधान आपल्या आगामी चित्रपट ‘घडा घडा बोलायचं’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचे नाव जितकं वेगळं आहे, तितकेच त्याची गाणी आणि संवाद हे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारे ठरू शकतात.

‘घडा घडा बोलायचं’ हा चित्रपट दिग्दर्शक नितीन रोकडे यांच्या नेतृत्त्वाखाली साकारला जात आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर मुख्य भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट एक संगीतमय रोमँटिक अनुभव देणारा असणार आहे.

सिमरन नेरुरकर जितने ‘माझा माँ’ चित्रपटात माधुरी दिक्षितच्या तरुणपणीची भूमिका साकारत होती, ती या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमा क्षेत्रात पदार्पण करत आहे. दुसरीकडे,आरोह वेलणकर आपल्या अभिनयाने ‘चंदू चॅम्पियन’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांवर ठसा उमठवला आहे. आता, ‘घडा घडा बोलायचं’मध्ये एक वेगळ्या अंदाजात तो प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘घडा घडा बोलायचं’मध्ये काही प्रमुख कलाकारांचा समावेश आहे, यात देविका दफ्तरदार, मिलिंद पाठक, किशोर चौगुले, पंकज विष्णू, राहुल बेलापूरकर, विशाल अर्जुन, पूनम चांदोरीकर, आणि चित्रा कोप्पीकर यांचा यामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे.