टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनुश्री वर्मा या दोघांमध्ये तिसरा आला असून हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो करत काही फोटोही डिलिट केले आहेत. या दरम्यान धनश्रीचा एका व्यक्तीसोबतचा फोटो व्हायरल झाला. फोटोमध्ये एक व्यक्ती धनश्रीला मागून मिठी मारताना दिसत असून त्याच्यामुळेच चहल आणि धनश्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे.
धनश्रीसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रतिक उतेकर आहे. तो कोरियोग्राफर असून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चांगलाच फेसम आहे. ‘डान्स दिवाने ज्युनियर’ आणि ‘नच बलिए-7’चा तो विजेताही राहिलेला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत फोटो आहेत. मौनी रॉय, सलमान खान, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि करण जोहर सारख्या सेलिब्रिटींना त्याने कोरियोग्राफ केलेले आहे.
View this post on Instagram
प्रतिकच्या इन्स्टाग्रामवर फक्त धनश्रीच नाही तर अन्य अभिनेत्रींसोबतही त्याचे फोटो आहेत. एका फोटोमध्ये तर तो कोरियोग्रामफर शक्ती मोहन याचे चुंबन घेतानाही दिसतोय. तर अन्य एका फोटोत रश्मी देसाईची गळाभेट घेताना दिसतोय. मात्र धनश्रीसोबतची त्याची जवळीक आणि त्यानंतर घटस्फोटाच्या उडालेल्या चर्चा यामुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रोलिंगला कंटाळून प्रतिक उतेकर याने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. एक फोटो पाहून मनाप्रमाणे कथा रचण्यासाठी आणि कमेंट करण्यासाठी जगातील लोक मोकळेच आहेत. ग्रो अप गाईज, अशी पोस्ट प्रतिकने केली. अर्थात यावरूनही त्याला लोकांना चांगलेच सुनावले असून काहीच नाही तर तुला स्पष्टीकरण का द्यावे लागतेय, असेही नेटकऱ्यांनी विचारले आहे.