पोलीस शिपायानं गळफास घेत जीवन संपवलं, बीडमधील खळबळजनक घटना

बीड पोलीस दलातील कर्मचार्‍याने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआबा, ता. केज) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस शिपाई अनंत इंगळे यांची ड्युटी मुख्यालयात होती. 8 जानेवारी रोजी त्यांनी सकाळी पोलीस वसाहतीतील राहत असलेल्या घराच्या बाजूला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैयक्तीक कारणामुळे त्यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवले आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.