सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली; म्हणाले, ‘दोन दिवसात सगळ्यांच्या…’

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण लावून धरले असून मुख्य सुत्रधार ‘आका’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सुरशे धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले. या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना धस यांनी माहिती दिली.

सुरेश धस म्हणाले की, राखेची असो किंवा वाळूची गँग असो किंवा वसुलीची गँग असो या सगळ्यांना मोक्का लावला पाहिजे. अन्यथा भविष्यामध्ये तिहार तुरुंगात जे होतंय आणि सलमान खानपर्यंत जे पोहोचतंय तसा काहीसा प्रकार होऊ शकतो.

वाल्मीक कराड याने लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवले. खाडे नावाच्या या अधिकाऱ्याकडे दीड कोटी रुपये सापडले होते आणि त्याला वाल्मीक कराडने वाचवले. वाल्मीक कराड चोरांचा, दडोरेखोरांचा साथीदार आहे, असा आरोपही सुरेश धस यांनी केला. तसेच दोन दिवसात या सगळ्यांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर करणार, असेही ते म्हणाले.

वाल्मीक कराडला सोडायला आलेली गाडी अजित पवारांच्या ताफ्यातली, सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणई केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंकी यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी आतापर्यंत आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आका या सगळ्यात आहे. आका आत जाईल, चौकशी होईल आणि त्यानंतर ज्याचे नाव यायचे त्याचे येईल, असे सुरेश धस म्हणाले. खंडणीबाबत सातपुडा बंगल्यावर बैठक झाली होती. त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे अजित पवार यांच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.

Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुले प्यादा, मुख्य आरोपी ‘आका’, सुरेश धस यांचा इशारा कुणाकडे?