
दक्षिण तिबेट आज शक्तिशाली भूपंपाने हादरले. 7.1 रिश्टल स्केल तीव्रतेच्या या भूपंपात तब्बल 126 जणांचा मृत्यू झाला तर 188 जण गंभीर जखमी झाले. तीन तासात तब्बल 50 हादरे बसले. शक्तीशाली हादऱयांमुळे लोक सैरावैरा पळू लागले. जिकडे तिकडे घरांचे ढिगारे, किंकाळ्या आणि आक्रोश असे चित्र होते. भूपंपाचे हादरे नेपाळ आणि हिंदुस्थान आणि बांगलादेशातील काही भागालाही बसले. दरम्यान, घटनेला 15 तास उलटूनही बचावकार्य सुरू आहे. ढिगायाखालून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.
भूपंपाचे पेंद्र तिबेटच्या डिंगरी येथे जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते. सकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी भूपंप झाला. घटनेला 15 तास उलटूनही बचावकार्य सुरू आहे. चीनच्या भूपंप नेटवर्क पेंद्राने भूपंप 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता असे म्हटले आहे तर अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागो हा भूपंप 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता असा दावा केला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी भूपंप पीडितांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, भूपंपात हजारांहून अधिक घरे जमिनदोस्त झाली. आज आलेला भूपंप गेल्या पाच वर्षांतील 200 किलोमीटरच्या परीघातील सर्वात शक्तीशाली भूपंप असल्याची नोंद चीनच्या भूपंप नेटवर्क पेंद्राने केली.
नेपाळ, बिहारमध्ये घरांना तडे
भूपंप इतका शक्तीशाली होता की नेपाळमध्ये अनेक भागात आणि हिंदुस्थानातील बिहारमध्ये अनेक घरांना तडे गेले. चीनने माऊंट एव्हरेस्ट जवळची पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. दरम्यान, दलाईलामा यांनी भूपंपात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे.