तमिळनाडूमध्ये HMPV व्हायरसचे आढळले दोन रुग्ण, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर

तमिळनाडूध्ये HMPV व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. एक रुग्ण राजधानी चेन्नईत तर दुसरा रुग्ण सालेममध्ये आढळला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली असून दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की HMPV व्हायरस नवीन नाही. 2001 साली हा व्हायरस जगासमोर आला होता. गर्दीत जाणे टाळणे आणि योग्य प्रमाणात पाणी पिऊन, आराम केल्यास हा आजार बरा होतो असे विभागाने म्हटले आहे. सध्या तमिळनाडूमध्ये दोन रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.