येत्या 10 जानेवारीपासून राजकोट येथे आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत असून या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सलामीवीर स्मृती मानधनाकडे सोपविण्यात आले आहे. या मालिकेसाठी हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंह यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थानने नुकतीच विंडीज विरुद्धच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा एकदा हिंदुस्थानी महिला सज्ज झाल्या आहेत. n हिंदुस्थानचा महिला क्रिकेट संघ ः स्मृती मानधना (कर्णधार), दिप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टिरक्षक), ऋचा घोष, तेजल हसबनीस, राघवी बिश्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितास साधु, सायमा ठाकोर, सायली सातघरे.