उत्तर प्रदेशमधील चित्रकूट शहरातील गोशाळांमध्ये दररोज थंडीमुळे चार गायींचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गायींचा मृत्यू होतोय असा आरोप होत आहे. या दरम्यानच दोन गायींचे मृतदेह ट्रॅक्टरला मागे लटकवून फरफटत नेले जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.